Mahendra Dalvi : 'सुनील तटकरे नेहमीच चीट करतात, शिवसेना आता खपवून घेणार नाही'; रायगडच्या पालकमंत्री पदावरून महेंद्र दळवींनी सुनावलं
रायगडच्या पालकमंत्री पदावरून निर्माण झालेला वाद आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पार टोकाला पोहोचला आहे. अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत सुनील तटकरे यांना इशारा दिला आहे. सुनील तटकरे नेहमीच चीट करत आले आहे. त्यावेळेस देखील त्यांनी चीट करून स्वतःच्या घरात पद घेतली हे शिवसेना खपवून घेणार नाही. भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री राहिले पाहिजे. यासाठी तटकरेंनी माघार घ्यावी. जोपर्यंत पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाही. तोपर्यंत राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही, अशी भूमिका महेंद्र दळवी यांनी व्यक्त केली आहे.
आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले की, "रायगडमध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळे काम करतो. परंतू पालकमंत्री पदावरून उद्भवलेला वाद जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत महायुतीकडे न बघता युतीच्या माध्यमातून स्वायत्त निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायतीला आम्ही सामोरे जाणार आहोत."