आजपासून होणारा बँकांचा संप मागे घेण्याची ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनची घोषणा

आजपासून होणारा बँकांचा संप मागे घेण्याची ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनची घोषणा

बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते आजच उरकून घ्या असे काल सांगण्यात आले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते आजच उरकून घ्या असे काल सांगण्यात आले होते. कारण आज19 नोव्हेंबर रोजी बँकांनी देशव्यापी संप पुकारला जाणार होता. मात्र ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनकडून आजपासून होऊ घातलेला देशव्यापी बँक संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळं आज देशभरातील बॅंका सुरु राहणार आहेत.

केंद्र सरकारने IBA आणि बँक युनियनला 16 नोव्हेंबर रोजी चर्चा सुरु करुन संप टाळण्यासाठी तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. दिल्लीत सीएलसी रामिस थिरु यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सलोखा बैठकीत हे निर्देश देण्यात आले होते. परंतु कोणताही तोडगा न निघाल्याने उद्या बँकांचा देशव्यापी संप होणार असल्याचं संघटनेनं सांगितलं होतं. त्यानंतर काल पुन्हा या मागण्यांबाबत चर्चा झाली आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) ने संप मागे घेण्याची घोषणा केली.

कर्मचाऱ्यांच्या मागील 5 वर्षांपासून लावून धरलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यास इंडियन बॅंक असोसिएशन आणि आर्थिक सेवा विभागाकडून होकार देण्यात आला आहे. मुख्य कामगार आयुक्तां(केंद्र) सोबत बॅंक संघटनांच्या झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com