Central Government : वर्षभरात देशातील सर्व टोलनाके बंद होणार; गडकरींची संसदेत मोठी घोषणा….

Central Government : वर्षभरात देशातील सर्व टोलनाके बंद होणार; गडकरींची संसदेत मोठी घोषणा….

पुढच्या एका वर्षात तुम्हाला कुठेही टोल दिसणार नाहीत. त्याचप्रमाणे टोलच्या मोठ्या रांगेत उभं राहण्याची देखील गरज पडणार नाही. यासाठी केंद्र सरकार (Central Government) एका विशेष प्रणालीवर काम करत आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

पुढच्या एका वर्षात तुम्हाला कुठेही टोल दिसणार नाहीत. त्याचप्रमाणे टोलच्या मोठ्या रांगेत उभं राहण्याची देखील गरज पडणार नाही. यासाठी केंद्र सरकार (Central Government) एका विशेष प्रणालीवर काम करत आहे. देशभरातील टोल प्लाझांवरील रांगा, टोलसाठी थांबावे लागणे आणि वेळ वाया जाण्याचा त्रास लवकरच संपणार आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, पुढील एका वर्षात संपूर्ण देशात एक नवीन “इलेक्ट्रॉनिक / barrier-less टोल वसुली प्रणाली” लागू केली जाईल. आत्ता या नव्या व्यवस्थेची सुरुवात १० ठिकाणांवर करण्यात आली असून, येत्या वर्षात ती संपूर्ण टोल बुथवर लागू होईल — म्हणजेच, टोलनाकर्‍याने तुमच्याकडे थांबवणे याची गरज राहणार नाही.आता टोल हा फक्त इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे स्वीकारला जाणार आहे. याचा वाहनचालकांना मोठा फायदा होणार आहे.

गडकरी गुरुवारी म्हणजेचं आज हिवाळी अधिवेशनात लोकसभेत (Loksabha) बोलताना म्हणाले की, 10 ठिकाणांहून नवीन प्रणाली सुरू करण्यात आली आहे आणि ती संपूर्ण देशात पुढील एका वर्षात विस्तारित केली जाईल. यामुळे टोल व्यवस्था सध्याची पूर्णपणे बंद होईल, असे ते म्हणाले. तुम्हाला कोणीही टोलच्या नावाखाली रोखणार नाही. ‘इलेक्ट्रॉनिक टोल वसुली’ एका वर्षाच्या आत, देशभरात लागू केली जाईल. गडकरी म्हणाले की, 10 लाख कोटी रुपयांचे 4500 महामार्ग प्रकल्प सध्या देशभरात सुरू आहेत.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल वसुली कार्यक्रम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केला आहे. केंद्र सरकारने यावर्षी ऑक्टोबरमध्ये फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा दिला. या सवलतीअंतर्गत, असे म्हटले गेले होते की फास्टॅग जर एखाद्या वाहनाकडे नसेल किंवा ते काम करत नसेल तर टोल प्लाझावर दुप्पट रोख कर देण्याऐवजी त्याला टोल टॅक्सच्या केवळ 1.25 पट रक्कम भरावी लागेल. या संदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. 15 नोव्हेंबरपासून देशभरातील टोल नाक्यांवर ही नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com