Anil Parab On Thackeray Bandhu Yuti : "कुठल्याही क्षणी युतीची..." ठाकरेबंधू युतीबाबत अनिल परबांचे मोठं वक्तव्य

सध्या नगरपंचायत, नगरपरिषद निवडणूकीचे निकाल लागले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने महानगरपलिकेच्या निवडणुका जाहीर केल्या. दरम्यान अनिल परबांनी मोठं वक्तव्य केलं.
Published by :
Riddhi Vanne

Anil Parab On Thackeray Bandhu Yuti : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या मोठ्या महानगरपालिकांसाठी मतदान 15 जानेवारीला होईल, तर निवडणुकीचे निकाल 16 जानेवारीला जाहीर केले जातील. महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोणत्याही क्षणी ठाकरेबंधूच्या युतीची घोषणा केली जाईल अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

अनिल परब नेमकं काय म्हणाले...

सध्या नगरपंचायत, नगरपरिषद निवडणूकीचे निकाल लागले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने महानगरपलिकेच्या निवडणुका जाहीर केल्या. दरम्यान अनिल परबांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, "कुठल्याही क्षणी युतीची घोषणा केली जाईल. मुंबईची जनता कायम ठाकरेंसोबत मुंबईकर ठाकरे बंधूंना साथ देणार असा विश्वास दाखवला आहे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com