Ambadas Danve : "मी पुन्हा येईन...", विधान परिषदेतील अंबादास दानवेंचे निरोप भाषण चर्चेत
महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाल पूर्ण करत असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्याने अर्थातच अंबादास दानवे यांनी सभागृहात दिलेलं निरोप भाषण दिले त्यावेळी त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा देत, “मी पुन्हा येईन,” हे विधान त्यांनी ठामपणे उच्चारलं....!
आपल्या भाषणाची सुरुवात करताना त्यांनी सर्व सत्ताधारी व विरोधी सदस्यांचे आभार मानत त्यांनी सभागृहातील अनेक वरिष्ठ नेत्यांच्या सद्भावनांचा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, “दहावीचा निरोप समारंभ झाला होता तेव्हा जसं पुन्हा कॉलेजमध्ये जावं लागलं होतं, तसं इथेही घडेल,” अशी मिश्कील पण आशयघन टिप्पणी करत त्यांनी ‘पुनरागमनाची’ खूणगाठ बांधली.
पुढे ते म्हणाले की, "ही भूमिका संपली असली तरी हे फक्त स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही,” हे शिंदे साहेबांचं विधान सांगत त्यांनी राजकीय पुनरागमनाची नोंद ठेवल्यासारखं केलं. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचं सहकार्य आणि अनुभवानं स्वतःला समृद्ध केल्याचं त्यांनी मान्य करत, “मी विचारांवर ठाम राहिलो, पण कधीही व्यक्तिवर टीका केली नाही,” असं ठामपणे नमूद केलं.