संभाजीनगमधला राडा भाजपा आणि MIM ने घडवला - अंबादास दानवे
Admin

संभाजीनगमधला राडा भाजपा आणि MIM ने घडवला - अंबादास दानवे

रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला आहे.

रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला आहे. राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या गटानं जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली.

पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या आणि खासगी मिळून 13 गाड्या जाळण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत 12 गोळ्या झाडल्या.

याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले की, औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर नामांतरावरून सुरु असलेल्या आंदोलनामुळे हा प्रकार घडला आहे. पोलिस अधिकाऱ्यांवर हात उचलण्याची हिंमत होते, हे हात तोडले पाहिजेत. या घटनेमागे एमआयएम आणि भाजप आहे. त्यांना शहरात दंगल पाहिजे. असे अंबादास दानवे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com