Ambadas Danve : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून अंबादास दानवे यांची सरकारवर टीका, म्हणाले...

Ambadas Danve : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून अंबादास दानवे यांची सरकारवर टीका, म्हणाले...

पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. 8 एप्रिल 2025 पासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात येत आहे. घरगुती गॅस सिलेंडर महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

सरकारने घरगुती गॅस सिलिंडर 50रुपये महाग केल्याचं जाहीर केलं आहे. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ८०३ वरून ८५३ झाली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठीही अनुदानित सिलेंडरची किंमत 500 वरून 550 करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे म्हणाले की, आज घरगुती गॅस ५० रुपयांनी वाढला. भक्तांनी औरंगजेबाची कबर खणावी.. समाधी समाधी करावं.. आणि लोकांचे खिसे कापणाऱ्या या असल्या निर्णयाचं स्वागत करावं.. बोला जय श्रीराम! जय जय श्रीराम!

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com