Ambadas Danve Speech
Ambadas DanveLokshahi

अंबादास दानवेंनी राज्य सरकारला धरलं धारेवर; ठाकरे गटाच्या संकल्प मेळाव्यात म्हणाले, "महाराष्ट्र कर्जाच्या खाईत..."

"महाराष्ट्रात हे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. हे सरकार आल्यापासून दररोज ९ आत्महत्या या महाराष्ट्रात होतात"
Published by :
Naresh Shende
Published on

Ambadas Danve On Maharashtra Government : केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, या राज्यात पापाशिवाय कोणत्याही गोष्टी करत नाहीत, अशाप्रकारची स्थिती आहे. जनतेला दिवसाढवळ्या फसवलं जातं. खोट्या घोषणा दिल्या जातात. राज्याच्या तिजोरीत खरखराट आहे, तरीही मोठ्या घोषणा दिल्या जातात. महाराष्ट्रात आजच्या घडीला भ्रष्टाचार आहे. अधिवेशनाचा शेवटचा आठवडा बाकी आहे. त्यामुळे हा भ्रष्टाचार आम्ही मांडणार आहोत. महाराष्ट्रात हे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. हे सरकार आल्यापासून दररोज ९ आत्महत्या या महाराष्ट्रात होतात. हे महाराष्ट्र कर्जाच्या खाईत बुडालेलं आहे. असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. ते शिवसेना ठाकरे गटाच्या संकल्प मेळाव्यात बोलत होते.

अंबादास दानवे पुढे म्हणाले, संभाजीनगरचा विचार केला, तर उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार असताना या शहरात अडीच हजार कोटी रुपये दिले होते. पण हे सरकार बदलल्यानंतर या शहराची पाणीपुरवठ्याची योजना सुरु झाली नाही. या संभाजीनगरमध्ये गॅस लाईन येणार होती. पण ही गॅसची पाईपलाईन कुठं अडली? हा माझा या सरकारला सवाल आहे. या जिल्ह्याच्या आणि शहराच्या अनेक विकासाच्या योजना या थांबलेल्या आहेत. ठाकरे साहेबांनी याठिकाणी जवळपास ११०० ते १२०० कोटी रुपयाच्या योजना दिल्या होत्या. आताचं सरकार या जिल्ह्यात असो किंवा या राज्यात असो, ते फक्त पाप आणि पापच करतात. पण येणाऱ्या काळात आपल्याला सदस्य नोंदणी करायची आहे. आपण त्यासाठी बैठका घेतल्या आहेत. बुथनिहाय किमान १०० सदस्य नोंदणी करायची आहे. येथील ९ च्या ९ विधानसभा मतदारसंघात आपल्याला १०० टक्के तयारी करायची आहे.

आपण संभाजीनगरच्या या सर्व जागा ताकदीनं लढू शकतो. काही कारणास्तव लोकसभेत आपल्याला अपयश आलं. हे गद्दार खूप माजलेले आहेत. यांना माता-भगिनी दिसत नाही, या पद्धतीनं हे काम करतात. ह्यांना शेतकरी दिसत नाहीत. यांना बेरोजगार तरुण दिसत नाहीत. आज पोलीस भरतीची परीक्षा आहे, पण काहीही व्यवस्था तिथे नाही. या सर्व स्थितीत राज्यसरकारचा पापाचा घडा भरलेला आहे. ज्यावेळी या राज्य रकारचा पापाचा घडा भरेल, त्या दिवशी मतदाररुपी श्रीकृष्ण या पापाच्या घड्यात राज्य सरकारला बुडवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्या सर्वांना पुढाकार घ्यायचा आहे, असंही अंबादास दानवे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com