Abu Azmi : अब्बू आझमींकडून पॅलेस्टाइनला समर्थन अन् राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

Abu Azmi : अब्बू आझमींकडून पॅलेस्टाइनला समर्थन अन् राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

एकीकडे महाराष्ट्रात ओला दुष्काळ परिस्थिती असताना अबू आझमींनी इस्त्रायलकडून पॅलेस्टाईनवर जे हल्ले होत आहेत, त्याच्या निषेधार्थ आझाद मैदानात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

एकीकडे महाराष्ट्रात ओला दुष्काळ परिस्थिती असताना अबू आझमींनी आयोजित केलेलं प्रोग्राम वादाचं कारण ठरलं आहे. इस्त्रायलकडून पॅलेस्टाईनवर जे हल्ले होत आहेत, त्याच्या निषेधार्थ 10 ऑक्टोबरला आझाद मैदानात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यात ओला दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली.

मात्र हा पाऊस शेतकऱ्यांसमोर जगायचं कसं? असा प्रश्न निर्माण करु लागला. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. राज्यातील नदी-तलावांचे पाणी ओलांडून गेले. एवढचं नाही तर धरण ही ओव्हरफ्लो होऊ लागले. यामुळे अनेक गावांना पाणीच पाणी झाले तर, लोकांच्या घरात पाणी घुसलं होतं. तसेच त्याच्या पिकांचंही मोठं नुकसान झालं होत.

अस असताना अबू आझमी मात्र पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोर्चाचं आवाहन करत आहेत. त्यात मोठ्या संख्येने सहभागीही होण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात मदत करणे आता गरजेच आहे. ओल्या दुष्काळाची परिस्थिती असताना खरी मदत शेतकऱ्यांना हवी आहे. तर दुसरीकडे राज्यातील नेते मात्र दुसऱ्या देशाच्या घटनेवर महाराष्ट्रात मोर्चा काढत आहेत, त्यामुळे आता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.

यावेळी ते म्हणाले की, "मी तमाम लोकांना आवेदन करु इच्छितो की, इस्राईलमुळे पॅलेस्टाइनमध्ये जी काही बरबादी झाली आहे, आणि तिथे जी काही दडपशाही सुरु आहे. ती बऱ्याच काळापासून सुरु आहे. त्यांच्याविरोधात 10 ऑक्टोबर रोजी आझाद मैदान मध्ये जलसेच्या प्रोग्रामचे आयोजन करण्यात आलं आहे तर मोठ्या संख्ये तेथे उपस्थित राहावे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com