BJP Mumbai President : मोठी बातमी! अमित साटम यांच्याकडे नव्या मुंबई अध्यक्षपदाची धुरा

BJP Mumbai President : मोठी बातमी! अमित साटम यांच्याकडे नव्या मुंबई अध्यक्षपदाची धुरा

सकाळी दहा वाजता भाजपच्या बैठकीला सुरुवात झाली असून या बैठकीत भाजपच्या नव्या मुंबई अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

मुंबई महानगरपालिकेकडे भाजपचे विशेष लक्ष असल्याच दिसून येत आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी भाजपची प्रदेश कार्यालयात तातडीची बैठक बोलवली. सकाळी दहा वाजता या बैठकीला सुरुवात झाली असून या बैठकीला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अमित साटम, यासह मुंबईतील महामंत्री आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत.

बैठकीला सर्व आमदार आणि खासदार नसून महत्वाचे नेते, जिल्हाध्यक्ष आणि महामंत्री उपस्थित आहेत. या बैठकीत भाजपचे मुंबईसाठी नवे अध्यक्षपद निवडण्याची शक्यता वर्तवली जात होती. यावेळी अमित साटम की प्रवीण दरेकर यांच्या पैकी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलेल असताना, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

यावेळी भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली असून अमित साटम यांची नवे मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अमित साटम हे 3 वेळा आमदार होऊन गेले आहेत. अमित साटम अभ्यासू आणि आक्रमक नेता असल्याच देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. त्याचसोबत साटम यांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपला चांगलं यश मिळेल आणि निवडणुकीत मुंबईत भाजपचाच झेंडा फडकणार असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com