केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत; लोकसभा जागावाटपावर आज निर्णय होण्याची शक्यता

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत आहेत. लोकसभा जागावाटपावर आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.

महायुतीच्या लोकसभा जागावाटपावर आज निर्णय होण्याची शक्यता असून जागा वाटपाबाब आज रात्री अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. राजकीयदृष्ट्या अमित शाह यांचा हा दौरा महत्वाचा समजला आहे. जागावाटपावर आज काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com