Amit Shah : नरेंद्र मोदींनंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असावा?; गृहमंत्री अमित शाहांनी सरळ सांगून टाकले...

Amit Shah : नरेंद्र मोदींनंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असावा?; गृहमंत्री अमित शाहांनी सरळ सांगून टाकले...

दक्षिणेतील राज्यांमध्ये सततच्या पराभवानंतर अमित शाह यांनी तामिळ पंतप्रधानांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

दक्षिणेतील राज्यांमध्ये सततच्या पराभवानंतर अमित शाह यांनी तामिळ पंतप्रधानांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अमित शाहा तामिळनाडू दौऱ्यावर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2024 लोकसभा निवडणुकांपूर्वी मोठं वक्तव्य केलं आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले अमित शाह चेन्नईमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बंद दरवाजाच्या बैठकीत बोलत होते.

अमित शाह म्हणाले की, आजपर्यंत 9 वर्षांच्या मोदी सरकारवर एक रुपयाचाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. यूपीए सरकारनं 10 वर्षात 12 लाख कोटींचा घोटाळा केला. या नऊ वर्षांत पंतप्रधान मोदींच्या सरकारनं देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याचं काम केलं आहे.

गरीब कुटुंबातील तमिळ व्यक्तीनं भारताचा पंतप्रधान व्हायला हवं. आपण तामिळनाडूतील दोन संभाव्य पंतप्रधान कामराज आणि मूपनार यांची संधी गमावली आहे. त्यांना पंतप्रधान पदापर्यंत न पोहचू देण्यासाठी डीएमके जबाबदार असल्याचंही ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com