Amit Shah Mumbai Tour : अमित शाह मुंबईत दाखल ; यंदाही लालबागच्या राजाचं दर्शन घेणार
सध्या राज्यभरासह देशात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. मुंबईमध्ये गणपतीचा आनंद अधिकप्रमाणात असते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमित शाह यांचे स्वागत केले. या दौऱ्यात ते लालबागच्या राजा आणि विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट देऊन गणेशाचे दर्शन घेणार आहेत.
या दौऱ्यामध्ये आगामी निवडणूका दरम्यान मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबतही माहिती विनोद तावडे यांच्याकडून घेतली आहे. दरम्यान उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत चर्चा सुद्धा करणार आहेत. तसेच वर्षा निवासस्थानावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन घेणार आहेत.
सकाळी 11 वाजता लालबागच्या राज्याचे दर्शन अमित शाह घेणार आहेत. दुपारी 12.00 वाजता भाजपाचे मंत्री आशिष शेलार यांचे मंडळ असलेल्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देखील अमित शाह भेट देणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अंधेरी पूर्व येथील श्री मोगरेश्वर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने स्थापन केलेल्या गणेशाचे दर्शन व पूजा दुपारी 1.00 वाजता अमित शाह घेणार आहेत.