Amit Thackeray
Amit Thackeray

Amit Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल; पोलिसांची नोटीस घेण्यासाठी आज नेरुळ पोलीस स्थानकात जाणार

नवी मुंबईतील नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगी शिवाय उद्घाटन केलं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Amit Thackeray) नवी मुंबईतील नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगी शिवाय उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 70 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याप्रकरणी आज अमित ठाकरे नवी मुंबईतील नेरूळ पोलीस स्टेशनला नोटीस घेण्यासाठी सकाळी 11 वाजता जाणार आहेत. याच्याआधी ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्प हार अर्पण करतील. यावेळी अमित ठाकरे काही बोलतात का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summery

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण प्रकरण

  • अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल

  • पोलिसांची नोटीस घेण्यासाठी आज अमित ठाकरे नवी मुंबईत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com