Lalbaugcha Raja Donation 2025: लालबागच्या गणरायाला अमिताभ बच्चन यांचं दान
Lalbaugcha Raja Donation 2025: लालबागच्या गणरायाला अमिताभ बच्चन यांचं दान; सोशल मीडियावर नाराजीची लाटLalbaugcha Raja Donation 2025: लालबागच्या गणरायाला अमिताभ बच्चन यांचं दान; सोशल मीडियावर नाराजीची लाट

Lalbaugcha Raja Donation 2025: लालबागच्या गणरायाला अमिताभ बच्चन यांचं दान; सोशल मीडियावर नाराजीची लाट

लालबागचा राजा: अमिताभ बच्चन यांचं दान, सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
Published by :
Riddhi Vanne
Published on

मुंबइतील नवसाला पावणारा बाप्पा म्हटले की आठवतो की, आपला लालबागचा राजा आहे. गणपती बाप्पा आज विर्सजन होत आहे. अनेक कलाकरांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले दरम्यान मोठमोठ्या देणग्या दिल्या होत्या. काही दिवसांपूर्वी किंग खान ट्रोल झाल्यानंतर आता बिंग बी म्हणजेच अमिताभ बच्चन हे देखील ट्रोलिंगला समोरे जात आहेत.

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी तब्बल 11 लाख रुपयांचे दान दिले आहे. पंरतू हा चेक देण्यासाठी ते स्वता: नव्हते गेले होते. त्यांनी त्यांच्या टीममार्फत हा चेक पाठवला. हा चेक मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी स्वीकारले. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल हेोत आहे. बिंग बी यांच्या या भक्तिभावपूर्ण योगदानावर समाजमाध्यमांवरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या श्रद्धेचं आणि उदारतेचं कौतुक केलं असलं, तरी बरेच युजर्स मात्र यावर नाराज असल्याचं दिसून येत आहे. विशेषतः पंजाबमध्ये सध्या भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने, अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, अशा संकटाच्या काळात तेथील नागरिकांना मदत करणे अधिक गरजेचे होते.

नेटकऱ्यांचा संताप : "पंजाबला मदत केली असती तर..."

सोशल मीडियावर अनेकांनी अशी भावना व्यक्त केली आहे की, पूरग्रस्त पंजाबमध्ये हजारो कुटुंबं उध्वस्त झाली असून, तिथल्या लोकांना सध्या अन्न, निवारा आणि मूलभूत गरजांची अत्यंत निकड आहे. यापार्श्वभूमीवर काही युजर्सनी अमिताभ बच्चन यांच्यावर टीका करत, "देवाच्या मूर्तीला नव्हे तर देवासारख्या गरजू माणसांना मदत करा" असं सुनावलं आहे.

काहीजणांनी याकडे लक्ष वेधलं की, अनेक सेलिब्रिटी धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर दान देतात, मात्र नैसर्गिक आपत्तीच्या वेळी फारच कमी जण मदतीसाठी पुढे येतात. “जर बच्चनसाहेबांनी पंजाबमधील काही कुटुंबांना आधार दिला असता, तर त्याची खरी पुण्याई झाली असती,” अशा भावना देखील व्यक्त होत आहेत.

पंजाबमध्ये पुराचा कहर : शेतसारा उद्ध्वस्त

पंजाबमध्ये सध्या 1988 नंतरची सर्वात भीषण पूरस्थिती आहे. हजारो गावे पाण्याखाली गेली असून, लाखो एकर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक लोकांना आपले घरदार गमवावे लागले असून, मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारी यंत्रणा मदतीसाठी सज्ज असली, तरी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे.

अमिताभ बच्चन यांनी भक्तिभावाने लालबागच्या राजाला केलेले दान निश्चितच त्यांचं वैयक्तिक श्रद्धास्थान दाखवतं. मात्र, सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीने पाहता, सध्याच्या कठीण प्रसंगी गरजू नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे करणं हे अधिक प्रभावी ठरलं असतं, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com