लोकशाही चॅनलवर कारवाई म्हणजे 'चोर सोडून संन्याशाला फाशी'- अमोल कोल्हे

लोकशाही चॅनलवर कारवाई म्हणजे 'चोर सोडून संन्याशाला फाशी'- अमोल कोल्हे

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. अमोल कोल्हे यांनी ट्वीट केलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. अमोल कोल्हे यांनी ट्विट केलं आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की, ही कारवाई म्हणजे 'चोर सोडून संन्याशाला फाशी' सत्तेची मस्ती डोक्यात गेलेल्या सरकारकडून सूडबुद्धीने माध्यमांचा गळा घोटला जातोय, या हीन वृत्तीचा जाहीर धिक्कार

लोकशाहीचा चौथा खांब असणाऱ्या पत्रकारितेची ज्याप्रकारे सत्ताधारी पक्षाकडून मुस्कटदाबी सुरू आहे, त्याचा समाजाच्या सर्वच स्तरांतून तीव्र निषेध व्हायलाच हवा! सत्य हे पचायला कठीण जरी असलं तरी जनतेसमोर सत्य आणण हे माध्यमांचं कर्तव्य आहे. पण इथं चुकीचं वागणारा बाहेर फिरतो व खरं वागणाऱ्याला शासन होते. अजब सरकारचा हा गजब कारभार पाहून हे सरकार लोकशाही विरोधी आहे, हे सिद्ध होतंय!

कमलेशजी या लढ्यात आम्ही आपल्यासोबत खंबीरपणे उभे आहोत! आपण एकजुटीने या हुकूमशाही विरोधात आवाज बुलंद करत राहू!

दरम्यान, अमोल कोल्हेनी लोकशाही न्यूजवरील या कारवाईचा ट्विटरवरुन एका शब्दात निषेध केला आहे. आणीबाणी, लिहीत अमोल कोल्हेनी टीका केली आहे. तर, अमोल कोल्हेंनीही प्रतिक्रिया देत 'चोर सोडून संन्याशाला फाशी' असल्याचं म्हणत तीव्र शब्दात टीका केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com