महात्मा फुले पगडी घालून अमोल कोल्हेंनी मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न, सरकारला दिला इशारा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी विधीमंडळात याबद्दल भाष्य केले आहे.
Published by :
Team Lokshahi

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव न मिळाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याचे पडसाद विधीमंडळात उमटले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी विधीमंडळात याबद्दल भाष्य केले आहे.

अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले यांची पगडी घातली होती. ही पगडी घालून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सरकारसमोर ठेवले. ते म्हणाले की, नारायणराव येथील शेतकऱ्यांना आज 4-5 रुपये किलो दराने टोमॅटो विकावा लागत. हाच टोमॅटो शहरी भागात 20-25 रुपये किलो दराने विकला जातो, याचे कारण आहे दलालांची साखळी. सरकारने या संदर्भातही विचार करण्याची गरज आहे."

"अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक शेतकरी हेक्टरी 30 क्विंटल उत्पादन घेतात, तर भारतात केवळ 10 क्विंटल उत्पादन होते. कारण अमेरिकेतील शेतकऱ्यांना जेएम व्हरायटी बियाणे वापरण्याचा अधिकार आहे, जो भारतातील शेतकऱ्यांना नाही. जिथे अमेरिका आपल्या शेतकऱ्यांना सक्षम करतेय तिथे भारतीय शेतकरी मात्र हमीभावासाठी झुंजतोय", दरम्यान अमोल कोल्हे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com