navneet-rana
navneet-ranaTeam lokshahi

राणा दाम्पत्याकडून आमच्या जीवाला धोका; मुलगी पळवून नेल्याचा आरोप असलेल्या तरुणाचे कुटुंब पोलीस ठाण्यात

अखेर खासदार नवनीत राणा यांच्यावर अमरावती येथील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. चार दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राडा घातला होता.

सूरज दहाट, अमरावती

अखेर खासदार नवनीत राणा यांच्यावर अमरावती येथील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. चार दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राडा घातला होता. खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात मुस्लीम मुलाचे वडील यांनी केली तक्रार दाखल केली होती.

या तक्रारी वरून पोलिसांनी कलम 500 बदनामी करणे आणि कलम 506 धमकी देणे अशी कलम लावली आहे,मात्र विनाकारण नवनीत राणा यांनी माझ्या मुलावर लव जिहादचे आरोप करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे पोलिसांनी दाखला केलेले अदखलपात्र गुन्हे वाढवून गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसांनी गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्या तरुणांच्या वडिलांनी केली,तसेच राणा दाम्पत्या कडून मुलाला व आमच्या कुटुंबातील लोकांवर दबाब असून आम्हाला जीवाला राणा दाम्पत्या कडून जीवाला धोका आहे आरोप करण्यात आला आहे.

Lokshahi
www.lokshahi.com