Earthquake : अमरावती हादरली पुन्हा! तीन महिन्यांत चौथ्यांदा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती
अमरावती जिल्ह्यातील शिवनगाव परिसरात पुन्हा एकदा भूकंपासारखे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी सुमारे 12 वाजून 7 मिनिटांच्या सुमारास हा हादरा बसला. यापूर्वी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजीही येथे असेच धक्के जाणवले होते. गेल्या तीन महिन्यांत चार वेळा असे हादरे बसल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुमारे महिनाभरापूर्वी भूगर्भशास्त्र विभागाची एक टीम शिवनगावमध्ये येऊन तपासणी करून गेली होती. त्यांनी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती, मात्र त्यातून कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. आता पुन्हा धक्के जाणवल्यामुळे नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे. प्रशासनाकडून शिवनगाव आणि शिरजगाव मोझरी येथे भूकंप मोजणारी यंत्रणा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण अजूनही ती बसवण्यात आलेली नाही. त्यामुळे ही यंत्रे तातडीने कार्यान्वित करावीत, अशी मागणी सरपंच धर्मराज खडसे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केली आहे.

आज सकाळी हादरा बसल्यानंतर सरपंच धर्मराज खडसे यांनी सांगितले की, आज जसे धक्के जाणवले तसेच हादरे मागील महिन्यात २४ तारखेलाही जाणवले होते. त्या वेळी दोन ते तीन वेळा जमीन हलल्याचे जाणवले होते. आजच्या घटनेनंतर फत्तेपूर परिसरातील काही घरांमधील भांडी खाली पडली असल्याचे दिसून आले. त्याची पाहणी करण्यात आली. धक्के जाणवताच अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले आणि रस्त्यावर उभे राहिले. शाळांमधील विद्यार्थ्यांनाही सुरक्षिततेसाठी तात्काळ वर्गाबाहेर काढण्यात आले.
दरम्यान, दहा दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातही अशाच स्वरूपाचे हादरे बसले होते. औंढा तालुक्यात भूकंपासारख्या हालचाली जाणवल्याने गावकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. त्याआधी वसमत तालुक्यात ३ डिसेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजून ४९ मिनिटांनी जमीन हादरली होती. पांगरा शिंदे आणि आसपासच्या भागात मोठा आवाज येऊन जमीन हलल्याचे नागरिकांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील सुमारे दहा गावांमध्ये हे धक्के जाणवले होते. पिंपळदरी गावात तर भीतीने लोक रस्त्यावर धावू लागले होते. याआधीही या भागात असे हादरे जाणवले होते. भूकंपाच्या या घटनांमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. मात्र प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते.