मनसेचे हम साथ साथ है कोणाबरोबर? राज ठाकरेंनी सरळ सांगून टाकले म्हणाले...
‘लोकमत’च्या पुरस्कार सोहळ्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत पार पडली. विशेष म्हणजे ही मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतली.
यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला की, तुम्ही कधी राष्ट्रवादीच्या जवळ दिसता, कधी शिवसेना तर तर कधी भाजपला टाळी देता. आता हम साथ साथ है कोणाबरोबर आणि केव्हा करणार?
यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, तर आता मी बोलूनच टाकतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही सध्या कोणाबरोबर आहेत तेच कळत नाही. कधीतरी ते शिंदेंबरोबर असतात. कधीतरी अजित पवारांचा चेहरा उतरलेला दिसतो. कुणाला भेटणं, बोलणं ही बातमी झालीय. काय आता तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी म्हणून बोलत नाही आहातच. म्हणून मी बोलतो. त्या सगळ्या गोष्टींना अर्थ नाही. कुणी कुणाला भेटलं तर युती आणि आघाडी होत नसतात. असे राज ठाकरे म्हणाले.