अमृता फडणवीस यांचं नवं देशभक्तीपर गीत प्रदर्शित

अमृता फडणवीस यांचं नवं देशभक्तीपर गीत प्रदर्शित

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवं देशभक्तीपर गीत प्रदर्शित झाले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवं देशभक्तीपर गीत प्रदर्शित झाले आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. अमृता फडणवीस यांनी आगामी बहुभाषिक ‘भारतीयन्स’ या चित्रपटातील ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा’हे गाणं गायलं आहे.

याच्या व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, “तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा! आगामी ‘भारतीयन्स’ या बहुभाषिक चित्रपटासाठी ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे देशभक्तीपर गाणे गाणं हा मोठा सन्मान होता. श्री सत्य कश्यप यांचं अंगावर शहारा आणणारं हे संगीत सर्वांनी ऐकायलाच हवं.”असे त्यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com