Amul Dairy
Amul DairyTeam Lokshahi

Amul Dairy : जीएसटी लागताच अमूलने वाढवले दर

डेअरी उत्पादनांवर 5% जीएसटी लागू केल्यानंतर अमूलचा हा निर्णय घेण्यात आला आहे. अमूलने दही, मठ्ठा, फ्लेवर्ड दुधासह दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ केली आहे.
Published by :
Team Lokshahi

सध्या महागाई दर (Inflation)) कमी होण्याची शक्यता दिसत नाही. 18 जुलैपासून सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटीचे दर वाढवले. त्याचा परिणाम त्वरित दिसू लागला आहे. भारतातील सर्वात मोठी डेअरी कंपनी (Amul Dairy) ने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. नवीन किमती 19 जुलैपासून लागू केल्या आहे. डेअरी उत्पादनांवर 5% जीएसटी लागू केल्यानंतर अमूलचा हा निर्णय घेण्यात आला आहे. अमूलने दही, मठ्ठा, फ्लेवर्ड दुधासह दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ केली आहे.

Amul Dairy
गुगलने केला नावात बदल : औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबाद धाराशीव

200 ग्रॅम कप दह्याची किंमत 20 रुपयांवरून 21 रुपये करण्यात आली आहे. 400 ग्रॅम दहीचा कप आता 40 रुपयांऐवजी 42 रुपयांना मिळणार आहे. अमूलचे दही पॅकेट आता 30 रुपयांऐवजी 32 रुपयांना मिळणार आहे. आता तुम्हाला एक किलोचे दह्याचे पॅकेट घेण्यासाठी 69 रुपये खर्च करावे लागतील. यापूर्वी त्याची किंमत 65 रुपये होती. अमूलची 170 मिलीची लस्सी आता 10 रुपयांऐवजी 11 रुपयांना मिळणार आहे.

Amul Dairy
उद्धव ठाकरे, राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, ही आहेत कारणे

अमूलची फ्लेवर्ड दुधाची बाटली आता 20 रुपयांऐवजी 22 रुपयांना मिळणार आहे. टेट्रा पॅकसह मठ्ठ्याचे 200 मिली पॅकेट 12 रुपयांऐवजी 13 रुपयांना मिळणार आहे. मात्र, 200 ग्रॅम लस्सीच्या कपच्या किमतीत वाढ झालेली नाही. पूर्वीप्रमाणे, ते केवळ 15 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

जीएसटीमुळे भाव वाढले

अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आरएस सोधी म्हणाले की, जीएसटी वाढल्यामुळे अनेक उत्पादनांच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत. तथापि, लहान पॅकेट्सवर वाढलेल्या किमती आम्ही स्वतः सहन करू. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जूनच्या अखेरीस GST परिषदेची 47 वी बैठक झाली. बैठकीत, जीएसटी परिषदेने या कर स्लॅबच्या बाहेर ठेवलेल्या काही खाद्यपदार्थांवर जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com