महागाईचा झटका; अमूल दुधाचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या नवा दर

महागाईचा झटका; अमूल दुधाचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या नवा दर

अमूल कंपनीने पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अमूल कंपनीने पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ केली आहे. दुधाच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. हे तत्काळ प्रभावाने लागू होईल. या वाढीनंतर अमूल गोल्डचे दर प्रतिलिटर ६६ रुपये, अमूल फ्रेश ५४ रुपये प्रति लिटर, अमूल गायीचे दूध ५६ रुपये आणि अमूल म्हशीचे दूध आता ७० रुपये प्रतिलिटर होणार आहे. अमूलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. अमूलने यंदा प्रथमच दुधाच्या दरात वाढ केली आहे. डिसेंबरमध्ये मदर डेअरीने दिल्ली एनसीआरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती.

कंपनीने सांगितले की, आता ग्राहकांना अर्धा लिटर अमूल ताज्या दुधासाठी २७ रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर अमूल गोल्डला अर्ध्या लिटरसाठी ३३ रुपये मोजावे लागणार आहेत. अमूल गायीच्या अर्धा लिटर दुधासाठी २८ रुपये मोजावे लागणार आहेत. अर्धा लिटर अमूल ए2 म्हशीच्या दुधासाठी ३५ रुपये मोजावे लागतील.उत्पादन आणि खर्चात वाढ झाल्याने अमूल दुधाच्या किमतीत वाढ झाल्याची माहिती कंपनीने एका निवेदनाद्वारे दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चाऱ्याच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने सांगितले की, इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या किमतीत 8-9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या वेळी अमूल कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती आणि आज 3 फेब्रुवारीला दुधाच्या दरात वाढ जाहीर केली आहे. अशा स्थितीत ऑक्टोबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत दुधाच्या दरात दर महिन्याला सरासरी 1 रुपयांनी वाढ झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com