नागपुरात खोदकाम करताना सापडली देवीची मूर्ती

नागपुरात खोदकाम करताना सापडली देवीची मूर्ती

नागपूरात खाली प्लॅाटमधून खोदकाम करताना आई जगदंबेचा मुखवटा सापडला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कल्पना नळसकर - असूर, नागपूर

नागपूरात खाली प्लॅाटमधून खोदकाम करताना आई जगदंबेचा मुखवटा सापडला आहे. समतानगर परिसरातील अन्वर ले आऊटमध्ये ईश्वर मोहबे यांच्या खाली प्लॅाटवर काल खोदकाम सुरु होतं. मजुर खोदकाम करताना आई जगबंदेचा मुखवटा सापडला आहे.

लोकांनी आई जगदंबेच्या मुखवट्याची पुजा सुरु केली असून महसूल विभागाने पंचनामा केला आहे. आज पुरातत्त्व विभाग याची तपासणी करणार आहे. सोशल मिडियावर हा व्हीडीओ व्हायरल झाल्याने आई जगदंबेच्या मुखवट्याची नागपूर शहरात चर्चा सुरु झालीय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com