प्रेयसीला भेटण्यासाठी घालून आला बुरखा आणि नागरिकांनी दिलं दणादण
Team Lokshahi

प्रेयसीला भेटण्यासाठी घालून आला बुरखा आणि नागरिकांनी दिलं दणादण

राज्यात सध्या मुलं पळवणारी टोळीचा अफवा सोशल मीडियावर पसरत आहे.
Published by :
shweta walge

राज्यात सध्या मुलं पळवणारी टोळीचा अफवा सोशल मीडियावर पसरत असल्याने नागरिक प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेने बघत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून गेलेल्या तरुणाला नागरिकांनी मुलं पळवणारी टोळी समजून बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकच्या इंदिरानगर परिसरात घडली आहे.

नाशिकमध्ये आठवडाभरात पाच जणांना मारहाण झाल्याच्या घटना आल्या समोर

नाशिकच्या येथील इंदिरानगर येथे प्रेयसीला बुरखा घालून भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

नाशिकच्या गंजमाळ येथेही बॅग चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना मुलं पळवणारी टोळी समजून मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या वेळी घडली होती.

मागील आठवड्यात टाकळी रोड परिसरात ब्लँकेट विक्रेत्यांनी आपल्याशी खेळत असलेल्या मुलांनी खोडसाळपणा केल्याने बाचाबाची झाली त्या दरम्यान नागरिकांनी मुलं पळवणारी टोळी समजून दोघांना बेदम मारहाण केली होती.

आठवडाभरातच या तीन घटनांमध्ये पाच जणांना सोशल मीडियाच्या व्हायरल मेसेजमुळे बेदम मारहाण खाण्याची वेळ आली, तिन्हीही घटनांमध्ये पोलीसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

सोशल मीडियावर मुलं पळवणाऱ्या फेक मेसेजला मोठे पेव फुटले आहे, अनेक जन तो व्हायरल करत असल्याने त्याचा इतरांनाच मोठा फटका बसू लागला आहे. मुलं पळवणाऱ्या टोळीबाबतच्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका असे पोलीसांकडून आवाहन करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com