Beed Crime : पती- पत्नीचा वाद विकोपाला
Beed Crime : पती- पत्नीचा वाद विकोपाला; रागाच्या भरात बापाने उचलेलं टोकाचं पाऊल Beed Crime : पती- पत्नीचा वाद विकोपाला; रागाच्या भरात बापाने उचलेलं टोकाचं पाऊल

Beed Crime : पती- पत्नीचा वाद विकोपाला; रागाच्या भरात बापाने उचलेलं टोकाचं पाऊल

बीड क्राईम: पती-पत्नीच्या वादानंतर पित्याने मुलीला गळफास दिला, स्वतःही आत्महत्या केली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

बीडमध्ये पती- पत्नीचा वाद विकोपाला

वादानंतर पतीने मुलीला दिला गळफास

मुलीच्या मृत्यूनंतर पतीनं गळफास घेत संपवलं जीवन

दोन दिवसानंतर रामगड परिसरात बापलेकीचा मृतदेह आढळला

बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीचा वाद विकोपाला पोहचला आहे. पती-पत्नीत झालेल्या वादानंतर पतीने मुलीला गळफास दिला तर स्वतःही आत्महत्या केल्याची घटना बीड तालुक्यात घडली. जयराम बोराडे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जयराम याचे त्याच्या पत्नीशी वाद झाले होते यानंतर त्याने मी माझ्या मुलीला घेऊन जातो असे म्हणत घर सोडले.

रागाच्या भरात त्याने रामगड परिसरात मुलीला गळफास दिला. त्यानेही त्याच ठिकाणी आत्महत्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे पाय खाली टिकू लागल्याने त्याने तेथून थेट इमामपूर रोडवर असलेल्या डोंगराळ भागात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. दोन दिवसांपूर्वी त्याचा मृतदेह आढळून आला परंतु मुलीचा मात्र शोध लागत नव्हता. ग्रामीण पोलिसांनी अथक परिश्रम घेतल्यानंतर रामगड परिसरात मुलगी अक्षराचा मृतदेह आढळून आला आहे.. याप्रकरणी आता ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com