Ravindra Waikar : शिवसेना खासदारांच्या इमारतीला आग; फायर सिस्टिममध्ये पाणी नसल्याने संताप
Ravindra Waikar : शिवसेना खासदारांच्या इमारतीला आग; फायर सिस्टिममध्ये पाणी नसल्याने संतापRavindra Waikar : शिवसेना खासदारांच्या इमारतीला आग; फायर सिस्टिममध्ये पाणी नसल्याने संताप

Ravindra Waikar : शिवसेना खासदारांच्या इमारतीला आग; फायर सिस्टिममध्ये पाणी नसल्याने संताप

शिवसेना (शिंदे गट) चे खासदार रवींद्र वायकर राहत असलेल्या इमारतीत दिवाळीच्या फटाक्यांमुळे आग लागल्याची घडलेली घटना समोर येत आहे. ही घटना इमारतीच्या 22 व्या मजल्यावर घडली असून, आग लागल्याचं समजताच रवींद्र वायकर स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यास मदत केली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

शिवसेना (शिंदे गट) चे खासदार रवींद्र वायकर राहत असलेल्या इमारतीत दिवाळीच्या फटाक्यांमुळे आग लागल्याची घडलेली घटना समोर येत आहे. ही घटना इमारतीच्या 22 व्या मजल्यावर घडली असून, आग लागल्याचं समजताच रवींद्र वायकर स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यास मदत केली. मात्र, त्या वेळी फायर सिस्टिममध्ये पाणीच नसल्याचं समोर आल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला. वायकर म्हणाले, “जर नव्या इमारतींमध्येच फायर सिस्टिम निष्क्रिय असेल, तर इतर जुन्या इमारतींची परिस्थिती किती भयावह असेल?” त्यांनी मुंबईतील प्रत्येक इमारतीच्या फायर सिस्टिमची तपासणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली.

या घटनेनंतर वायकर यांनी सांगितले की, यंदाच्या दिवाळीत रॉकेट फटाक्यांमुळे मुंबईत अनेक ठिकाणी इमारतींना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा घातक फटाक्यांवर बंदी आणि कठोर कारवाईची मागणी ते संसदेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, “रॉकेट बॉम्ब इमारतींच्या दिशेने फोडू नका. दिवाळी आनंदाने साजरी करा, पण सुरक्षिततेची काळजी घ्या.”

दरम्यान, खासदार रवींद्र वायकर यांनी नुकताच दिल्लीतील निवासस्थानी पहिल्यांदाच दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी मराठी संस्कृतीचा आणि पारंपरिक मराठी खाद्यपदार्थांचा (वडापाव, मिसळ इत्यादी) आस्वाद दिल्लीतील मराठी लोकांना दिला. वायकर म्हणाले, “मुंबई आणि महाराष्ट्रातील दिवाळीची संस्कृती दिल्लीमध्येही अनुभवता यावी, म्हणून हा उपक्रम राबवला.” या संपूर्ण घटनेत वायकर यांची तत्परता आणि इमारतीतील सुरक्षेविषयीची जाणीव नागरिकांसाठी आदर्श ठरली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com