Mumbai Crime : महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर! महिला वैमानिकेबरोबर विनयभंग
Mumbai Crime : महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर! महिला वैमानिकेबरोबर विनयभंग Mumbai Crime : महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर! महिला वैमानिकेबरोबर विनयभंग

Mumbai Crime : महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर! महिला वैमानिकेबरोबर विनयभंग

मुंबई गुन्हेगारी: महिला पायलटबरोबर घाटकोपरमध्ये विनयभंग, महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर.
Published by :
Team Lokshahi
Published on

Ghatkopar Crime News : मुंबईमध्ये घाटकोपर येथे महिला विमान पायलटबरोबर विनयभंगाचा प्रकार गुरुवारी घडला. खाजगी टॅक्सीमध्ये तीन जणांनी विनयभंग केल्याची ही प्राथमिक माहिती मिळत आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पतीला भेटल्यानंतर पीडित महिलेने घरी जाण्यासाठी ऑनलाइन गाडी बुक केली. त्या गाडीत अनोळखी व्यक्तींनी त्या महिला पायलटचा विनयभंग केल्याचे समजते. याप्रकरणी राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पीडीत 28 वर्षीय महिला एका खाजगी विमान कंपनीत कामाला असून तिचे पती सुद्धा नौदलामध्ये अधिकारी आहेत. तिच्या पतीला भेटण्यासाठी पायलट महिला गेली होती. त्यानंतर रात्री 10 च्या सुमारास जेवण केल्यानंतर तिच्या पतीने उबर कंपनीची गाडी घरी जाण्यासाठी बुकींग केली होती. महिला गाडीमध्ये बसल्यानंतर गाडी पुढे गेल्यावर चालकाने अचानक गाडीचा रस्ता बदलला, आणि गाडी थांबबली. त्यावेळेस दोन अनोळखी पुरुष त्या गाडीमध्ये बसले. अनोळखी पुरुषांना पाहून महिला घाबरली आणि आरडाओरडा करायला लागली. मात्र त्या दोघांपैकी एका पुरुषाने त्या महिलेला धमकवायला सुरुवात केली. आणि दुसऱ्या पुरुषाने त्या महिलेला अश्लील स्पर्श करण्यास सुरुवात केली. थोडे अंतर पुढे गेल्यावर अचानक पोलिसांची नाकाबंदी पाहून चालकाने गाडी थांबवली आणि ते दोन्ही पुरुष फरार झाले. त्यानंतर चालकाने महिलेला तिच्या घरी सोडले. घडलेला सर्व प्रकार महिलेने आपल्या पतीला सांगितला आणि त्यांनी तात्काळ घाटकोपर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली.

हा सर्व प्रकार चालू असताना वाहनचालकाने काहीच हालचाल केली नाही किंवा कोणताही विरोध दर्शवला नाही. याप्रकरणामध्ये वाहनचालकासह दोन अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल केला असून उबर कंपनीच्या वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र बाकी दोन आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com