A. T. Patil Jalgaon : 'माझ्याशी दुश्मनी घेऊ नको, तुला...', माजी खासदार ए.टी. पाटलांची कोणाला धमकी?

महायुतीमधूनच जळगावचे माजी खासदार ए.टी. पाटलांची एक आक्षेपार्ह कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. यामुळे राजकारणात पुन्हा चर्चेला उधाण आला आहे.
Published by :
Prachi Nate

थोडक्यात

  • माजी खासदार ए.टी. पाटलांची आक्षेपार्ह कॉल रेकॉर्डिंग व्हायरल...

  • "माझ्याशी दुश्मनी घेऊ नको, तुला उलटा करेल"

  • ए.टी. पाटलांनी कार्यकर्त्याला फोनवर दिली धमकी

सध्या राज्यात राजकीयवर्तूळात अनेक घटना घडत आहे. ज्यामुळे नामवंत नेते हे वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आयपीएस अधिकाऱ्यासोबत्या कॉलप्रकरणामुळे चर्चेत येताना दिसले. अस असताना महायुतीमधूनच जळगावचे माजी खासदार ए.टी. पाटलांची एक आक्षेपार्ह कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.

त्यात पाटील एका कार्यकर्त्याला धमकी देत असल्याचं समोर आलं आहे. या रेकॉर्डिंग व्हायरलमुळे राजकारणात पुन्हा चर्चेला उधाण आला आहे. "माझ्याशी दुश्मनी घेऊ नको, तुला उलटा करेल" अशा प्रकारची धमकी ए.टी. पाटलांनी कार्यकर्त्याला फोनवर दिली.

अशोक तापीराम पाटील उर्फ ए.टी.नाना पाटील हे जळगाव लोकसभा मतदार संघातील ते भाजपचे खासदार आहेत. नगरपालिकेच्या निवडणूकीपासून त्यांनी राजकारणाला सुरूवात केली. त्यामुळे आता ते एका कॉल रेकॉर्डिंगमुळे अडचणीत पडण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी या ऑडिओ क्लीपची पुष्टी करत नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com