अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; पत्रात काय?
अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रीक निवडणुकीमध्ये आपल्या भाजपा पक्षाचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला होता. यात प्रामुख्याने राज्यातील शेतकऱ्यांवर असलेले संपूर्ण कर्ज माफ करण्याचे आश्वासन सुध्दा देण्यात आले होते.
सरकार स्थापन होवून आता महिना उलटून गेला आहे. परंतु आपण शेतक-यांना दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी कोणत्याही हालचाली दिसून येत नाही. राज्यात आपले सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षा होती की त्यांच्यावरील संपूर्ण कर्ज माफी होईल. परंतु असे होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.
तरी आपण विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करुन राज्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करावा, ही विनंती. असे अनिल देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.