अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; पत्रात काय?
अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रीक निवडणुकीमध्ये आपल्या भाजपा पक्षाचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला होता. यात प्रामुख्याने राज्यातील लाडक्या बहीणीना जे १५०० रुपये मानधन देण्यात येत आहे त्यात वाढ करुन २१०० रुपये करणार असे जाहीर केले होते.
राज्यात सरकार स्थापन होवून दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. परंतु लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ होण्यासाठी कोणत्याही हालचाली दिसत नाही. मला मिळालेल्या माहितीनुसार, महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून लाडक्या बहिर्णीच्या अर्जाची छानणी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यात इतर विभागाची सुध्दा मदत घेण्यात येणार आहे.
परंतु या छानणीच्या आडुन मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणचे अर्ज रद्द करण्यात येणार आहे. जर असे झाले तर यासाठी राज्यभर मोठे आंदोलन उभे करण्यात येईल. तरी आपण लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन तातडीने पुर्ण करावे, तसेच छानणीच्या आडुन लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द करुन नये, हि विनंती. असे अनिल देशमुख यांनी पत्रात लिहिलं आहे.