Anil deshmukh
Anil deshmukh Team Lokshahi

Money Laundering Case : अनिल देशमुखांना जामीन की तुरुंगातील मुक्काम वाढणार? आज निकाल

न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यापुढे देशमुखांच्या जामीन अर्जावर आज (शुक्रवारी) सुनावणी होणार
Published by :
Shweta Chavan-Zagade

शंभर कोटी वसुलीप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) कोठडीत आहेत. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज (Anil Deshmukh Bail) दाखल केला होता. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यापुढे देशमुखांच्या जामीन अर्जावर आज (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे. देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांवर प्रभाव टाकला, असा आरोपही ईडीनं केला आहे.

ईडीच्यावतीनं सहाय्यक संचालक तसिन सुलतान यांच्यावतीनं ईडीचे वकील श्रीराम शिरसाट यांनी उत्तरादाखल काल (गुरुवारी) 56 पानी प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं. देशमुख हेच या मनी लॉन्ड्रिंगच्या कटामागेच मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवण्यासाठी अधिकृतपणे आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे. पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पोस्टिंग तसेच पोलीस अधिकार्‍यांच्या कामगिरीवर अवाजवीपणे त्यांनी प्रभाव टाकल्याचंही यात नमूद केलेलं आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सध्या प्राथमिक टप्प्यात आहे.

प्रकरण नेमकं काय?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांना ईडीने 2 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. पीएमएलए न्यायालयानं 18 मार्च रोजी देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला अनिल देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हानं दिलं आहे. प्रकृता अस्वस्थाचं कारण तसेच वाढतं वय पाहता आपल्याला जामीन देण्याची विनंती देशमुखांकडनं करण्यात आली आहे. अनिल देशमुख हे 73 वर्षांचे असून त्यांचा खांदा निखळलेला आहे, त्याचसोबत उच्च रक्तदाब आणि विविध आजारांनी ते ग्रस्त आहेत. याशिवाय त्यांना कोविड 19 ही होऊन गेलाय, या आजारांमुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम झाल्यानं त्यांना सतत आधार आणि दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून रहावं लागतंय. त्यामुळे मनवतेच्या भावनेनं जामिनावर सोडण्याची विनंती देशमुखांनी हायकोर्टाकडे केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com