Anjali Damania Vs Dhananjay Munde : अंजली दमानिया मुंडेंवर पुन्हा कडाडल्या! मुंडेंवर एक नवा आरोप करत राजिनाम्याची मागणी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांचे आणखी बॉम्ब फोडले आहे. यावेळी त्यांनी कोणते कोणते घोटाळे केले आणि कशा प्रकारे केले याबद्दल सांगितल आहे. IFFCO मध्ये महाघोटाळा केल्याचा आरोप करत, मुंडेंची कोणत्याही पदावर बसण्याची पात्रता नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांच्या राजिनाम्याची मागणी केली आहे.
यावेळी अंजली दमानिया म्हणाल्या की, "धनंजय मुंडे खोटं बोलून दिशाभूल करत आहेत. जोपर्यंत मुंडे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही. मुंडे मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतरच न्याय मिळेल. ऑफिस ऑफ प्रॉपर्टी मी मांडत नाही. मुंडेंची कोणत्याही पदावर बसण्याची पात्रता नाही. धनंजय मुंडे कधीही मंत्री झाला नाही पाहिजे! असं म्हणत धनंजय मुंडेंवर अपेक्षीत कारवाई होत नाही असं अंजली दमानिया म्हणाल्या. तसेच दमानियांनी धनंजय मुंडेंना आवाहन केलं आहे की, हातात पेपर घेऊन बोला. तसेच यावेळी त्यांनी मुंडेंवर IFFCO मध्ये महाघोटाळा केल्याचा आरोप केला आहे".
"धनंजय मुंडे खोटे बोलून हे असे पत्र पाठवतात शासन मान्यता असल्याचे खोटे सांगून जीआर मिळवतात आणि ते करून घेत आहेत. इतकी जर यांची लिमिट होत असेल तर त्यांना कुठल्याच मंत्री पदावर कधीही बसता कामा नये, यांची तितकी पात्रताच नाही. कारण इतका भ्रष्ट माणूस मंत्रिमंडळाचे निर्णय झाले आहेत असे दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री कधीही नाही झाला पाहिजे, कृषिमंत्री तर कधीच नाही, अशी माझी थेट मागणी आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी आणि अजित पवारांनी आता तरी कारवाई करावी".
"कृषी घोटाळा नंबर 2 मध्ये धनंजय मुंडे कुठल्याही पद्धतीने वाचत नाहीत. हे एक पत्र आहे या पत्रावर तारीख नाही. मंत्री लिहितात पण तारीख लिहिलेली नाही. या पत्रात लिहिले आहे की दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत विचारात ठेवलेल्या मंजूर झालेला कृषी विभागाच्या प्रस्तावचे इतिवृत्त कायम करण्यात आले. म्हणजे हा मंत्री किती थराला जाऊ शकतो, याचे हे धडधडीत उदाहरण आहे. मी या दोन्ही तारखांच्या बैठकांचे अटॅचमेंट पाठवले आहेत. कुठेही निर्णय झालेला नाही आणि मंत्री लिहितात काय. महाराष्ट्र शासन कार्य नियमावली व त्या अन्वये दिलेल्या अनूदेशनमधील तरतुदीनुसार मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने त्वरित कारवाई करावी, मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याप्रमाणे तातडीने, आता मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेलाच नाहीये".