भाजपच्या जनआक्रोश रॅलीत बायका नाचवल्या, ही कोणती संस्कृती?; अंजली दमानिया यांचा चित्रा वाघ यांना सवाल

भाजपच्या जनआक्रोश रॅलीत बायका नाचवल्या, ही कोणती संस्कृती?; अंजली दमानिया यांचा चित्रा वाघ यांना सवाल

उर्फी जावेद नेहमी आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. यावेळेस भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आता तिच्या फॅशनमुळे उर्फी जावेदवर भडकल्या आहेत.

उर्फी जावेद नेहमी आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. यावेळेस भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आता तिच्या फॅशनमुळे उर्फी जावेदवर भडकल्या आहेत. आज थेट त्यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे आयुक्त तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेत पत्र दिले आहे. उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी केली आहे. याबद्दल चित्रा वाघ यांनी एक ट्वीटही केले आहे. या एकूण वादात आता उर्फी जावेदने शिवीगाळ करत प्रत्युत्तर दिलं आहे.

याच पार्श्वभूमीवर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, चित्रा वाघ यांना सवाल केला आहे. प्रिय चित्राताई वाघ, भाजपच्या श्री रमेश बिधुरी यांची ही जन आक्रोश महासभा आहे. या बद्दल आपल्याला काय मत आहे? याला आपण कुठली संस्कृती म्हणाल? याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का? असा सवाल त्यांनी चित्रा वाघ यांना विचारला आहे. अंजली दमानिया यांनी राजस्थानच्या अलवरमधील भाजपच्या जन आक्रोश सभेचा व्हिडीओ त्यांनी ट्विट केला आहे.

भाजपच्या जनआक्रोश रॅलीत बायका नाचवल्या, ही कोणती संस्कृती?; अंजली दमानिया यांचा चित्रा वाघ यांना सवाल
उर्फी जावेद-चित्रा वाघ वादात आता सुषमा अंधारेंनी शेअर केले अमृता फडणवीस, केतकी चितळे अन् कंगनाचे फोटो, म्हणाल्या...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com