ताज्या बातम्या
Anjali Damania : राजीनामा फिक्स? अंजली दमानिया कोणता गौप्यस्फोट करणार?
बीड प्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
बीड प्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरुन अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अंजली दमानिया यांनी ट्विट केलं आहे.
या ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी ११ वाजता माझ्या घरून पत्रकार परिषद घेणार आहे. हे भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. गेले ४ दिवस त्याच्यावर काम केलं आहे. असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
अंजली दमानिया यांची उद्या पत्रकार परिषद असून त्या काय गौप्यस्फोट करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.