Arjun Khotkar replied to Anjali Damania : हा जुन्या कडीला उत आणण्याचा प्रकार
अंजली दमानिया यांनी गुरुवारी जालन्यात पत्रकार परिषद घेऊन अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 'अर्जुन खोतकर जिथं हात घालतात, तिथं माती होते,' असं अंजली दमानिया म्हणाल्या होत्या. अंजली दमानियांच्या आरोपांवर अर्जुन खोतकर यांनी आता सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.
अर्जुन खोतकर म्हणाले की, "तुम्ही जिथे हात लावता तिथे माती करता असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. हा जुन्या कडीला उत आणण्याचा प्रकार आहे. या संदर्भामध्ये देशाची सर्वोच्च संस्था ईडी यांनीही चौकशी केली आहे. ईडीने कारखाना ताब्यात घेतला आहे, अजून कोणती चौकशी करणार आहे. त्यांचं म्हणणं आहे, ना रस्ता कुठून तरी जाईलच ना, या जागेतून जाईल नाहीतर त्या जागेवरून जाईल. ठीक आहे. मी तुम्हाला लेखी देतो, माझ्या कारखान्यातून रस्ता टाकू नका, तुम्हाला जेथून रस्ता टाकायचा तिथून टाका. तुमच्या बोलण्याप्रमाणे तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा लेखी देईल, हा रस्ता माझ्या कारखान्यातून जाऊ नये, म्हणून त्यांनी कॅन्सल करून आणावा."
पुढे खोतकर यांनी नमूद केले की, "माझ्या नावाने तो कारखान, जमिनी, सत्तर कोटी काय काय म्हणतात मला काही कळत नाही. या कारखान्यात फक्त ७ टक्के मी पार्टनर आहे. ७० लाखांचे शेअर्स माझे आहे, कारखाना सुरू व्हावा यासाठी मी घेतले आहे. ज्या दिवशी बँका कर्ज द्यायला तयार होतील, पुन्हा शेतकऱ्याच्या सेवेमध्ये हा कारखाना सुरू राहील. मला असं वाटतं अशाप्रकारे बदनाम करणं चुकीचं आहे, माझ्यावर अन्याय करणार आहे. सुप्रीम कोर्टाने कामगारांच्या प्रश्नांमध्ये स्टे दिलेला आहे. कारखाना मी पहिला घेतला का, पहिला घेणारे तापडिया आहे, दुसरी आहे अर्जुन शुगर फॅक्टरी. त्यात मी ७ टक्क्याचा पार्टनर आहे. मला असं वाटतं, हे स्वतःहून स्वर्गात जाण्यासारखं आहे. यांना कारखान्यातून रस्ता नको आहे ना, तर आज माझी तयारी आहे. त्यांना पत्र द्यायची. मी एवढ्या झपाट्याने कामाला लागलो आहे, सर्व विषयावर मी बोलतोय, काम करतोय. माझी बाजू पण त्यांनी ऐकून घेतली पाहिजे, मी पण त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेल किंवा माझा माणूस त्यांच्याकडे पाठवेल. मी पण माझी बाजू त्यांना सांगेल."