Anmol Bishnoi : अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची एनआयए कोठडी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Anmol Bishnoi) अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. अनमोल बिश्नोईला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात केलं हजर करण्यात आले. त्यानंतर अनमोल बिश्नोईला पटियाला हाऊस न्यायालयानं 11 दिवसांची एनआयए कोठडी ठोठावली आहे.
कडक सुरक्षेत त्याला पटियाला हाऊस कोर्टात नेण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोईचा सहभाग असल्याचा आरोप असून सलमान खान याच्या घरावर जो गोळीबार करण्यात आला त्यामध्ये देखील याचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे.
अनमोल बिश्नोईच्या अटकेने या प्रकरणांच्या तपासाला वेग मिळणार आहे. आता अनेक गुन्हांच्या तपासाला वेग येणार असून अनेक खुलासे समोर येणार आहेत.
Summery
अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले
अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची एनआयए कोठडी
मुंबई पोलीस अनमोलचा लवकरच ताबा घेण्याची शक्यता
