Anna Hazare On Dhananjay Munde : 'आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून राजीनामा दिला पाहिजे'; अण्णा म्हणाले.

अण्णा हजारे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून राजीनामा देण्याची मागणी केली आहे. जाणून घ्या अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया.
Published by :
Prachi Nate

बीड सरपंच हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप असताना त्यांच्या राजिनाम्याची मागणी होत आहे. तसेच माणिकराव कोकाटे यांना देखील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आरोप झाले तर जबाबदारी म्हणून पहिले आपण राजीनामा दिला पाहिजे. नाव न घेता समाजसेवक अण्णा हजारेंचा माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेवर प्रहार?; मंत्री मंडळातील मंत्र्यांवर बोलतांना अण्णांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अण्णा हजारे म्हणाले की, "मंत्रिमंडळात राहून ज्यावेळेस आरोप होतात त्यावेळेस एक क्षण सुद्धा पदावर राहण दोष आहे. लगेच राजीनामा देऊन मोकळ व्हायचं ही आपली जबाबदारी आहे. अशे मंत्री जे मंत्रिमंडळात घेतात त्यांनी आधीच विचार करायला हवा. सुरुवातीला हेच चुकत आणि चुकल्यानंतर अशा या घटना घडतात. त्याच्यामुळे राज्याचा नुकसान होतो, देशाचा नुकसान होतो, समाजाचा नुकसान होतो. याचा विचार करण गरजेच आहे".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com