बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचितच्या युतीची आज घोषणा
Admin

बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचितच्या युतीची आज घोषणा

शिवसेना आणि वंचितच्या युतीची आज घोषणा
Published by :
Siddhi Naringrekar

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली जाणार आहे.  या युतीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीनं आज राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. हाच मुहूर्त साधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली जाणार आहे.

यापार्श्वभूमीवर  आज दुपारी 1 वाजता यासंबंधित एक पत्रकार परिषद होणार आहे. आज विधीमंडळामध्ये राज्य सरकारच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात येणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या युतीची घोषणा होणार असल्याचं ट्विट केलं आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एल्गार, संयुक्त पत्रकार परिषद. 23 जानेवारी दुपारी 12.30 वाजता. आंबेडकर भवन, नायगाव, दादर… महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व… असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

या युतीची घोषणा दादरच्या आंबेडकर भवनात केली जाणार आहे. आंबेडकर भवनात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आंबेडकर भवनात येणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com