Election Commission : महापालिका निवडणुकांची घोषणा! दुबार मतदार अन् चुकीचा पत्ता, निवडणूक आयोगाने काय दिलं स्पष्टीकरण?

Election Commission : महापालिका निवडणुकांची घोषणा! दुबार मतदार अन् चुकीचा पत्ता, निवडणूक आयोगाने काय दिलं स्पष्टीकरण?

महानगर पालिकेच्या निवडणुका (Election) गेली अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या अखेर आज घोषणा झाली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाही केला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महानगर पालिकेच्या निवडणुका (Election) गेली अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या अखेर आज घोषणा झाली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाही केला आहे. त्यानुसार 15 जानेवारी 2026 मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी लागणार आहे. दरम्यान, मतदार याद्यांवरील घोळासंदर्भात आणि दुबार मतदारांवर निवडणूक आयोगाने भाष्य केलं आहे.

जास्तीत जास्त 20 टक्के आणि कमीत कमी 5 टक्के दुबार मतदार हे आढळून आले आहेत. तसंच, आम्ही दोन दिवसांपूर्वी सर्व राजकीय पक्षांशी बैठक घेतली आहे. त्या बैठकीत सर्वांचं समाधान झाल्यानंतरच आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे असंही निवडणूक अधिकारी म्हणाले आहेत. मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार आढळले आहेत. या मतदारांना तुम्ही नेमकं कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार, असे विचारण्यात येईल. तसेच या दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार असे नमूद असेल असंही ते म्हणाले.

स्वच्छता गृहात 10 मतदार दाखवले. त्यामध्ये सत्यता तपासली असता त्या जागेवर एक इमारत होती, तेव्हा त्या नोंदी झाल्या होत्या असं म्हणत ती चूक आता दुरुस्त केली जाणार आहे असंही ते म्हणाले. त्याचबरोबर मतदारांचे नाव जोडण्याचे आणि वगळण्याचे अधिकार आम्हाला नाहीत असंही निवडणूक अधिकारी म्हणाले आहेत. तसंच, सेक्शन अॅड्रेस हा एक ट्रेड मार्क असतो, ज्याला आपण विभागीय पत्ता म्हणतो. तो काही एखाद्याचा पत्ता नसतो असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

मुंबईत एकूण 227 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या सर्व जागा जिंकण्यासाठी तसंच मुंबई महापालिका निवडणुकीत आपलाच विजय व्हावा यासाठी राजकीय डावपेच आखले जात आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपा आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असे तिन्ही पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काहीशी फूट पडल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसने आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असं सांगितलं आहे. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या ठाकरे यांचा शिवसेना पक्ष मनसेसोबत युती करून ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com