Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या

बांगलादेशात धक्कादायक घटना घडली आहे
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Bangladesh) बांगलादेशात धक्कादायक घटना घडली आहे. बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली.

ही घटना सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. त्या तरुणाचे नाव मणि चक्रवर्ती असे असून नरसिंगडीच्या पलाश उपजिल्ह्यातील चारसिंदूर बाजारात किराणा दुकान चालवत होते. मणी चक्रवर्ती नेहमीप्रमाणे त्यांच्या दुकानात बसले असताना अचानक अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात नेले मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल आता चिंता व्यक्त केली जात आहे.

Summary

  • बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या

  • बाजारात किराणा व्यापाऱ्याची हत्या

  • 18 दिवसांतली ही सहावी घटना

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com