Lokshahi Marathi CrossFire With Nitesh Rane : 'लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणणार', राणेंचा इशारा

सध्या राज्याच्या राजकारणात महापालिका निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. वेगवेगळ्या आश्वासनांनी 29 महापालिकांमधील मतदारांना मतदानासाठी आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सगळेच राजकीय पक्ष करतायत.
Published by :
Riddhi Vanne

Lokshahi Marathi CrossFire With Nitesh Rane : सध्या राज्याच्या राजकारणात महापालिका निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. वेगवेगळ्या आश्वासनांनी 29 महापालिकांमधील मतदारांना मतदानासाठी आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सगळेच राजकीय पक्ष करतायत. वेळोवेळी आखली जाणारी राजकीय पक्षांची रणनीती मतदारांना मात्र बुचकळ्यात टाकणारी आहे. त्याला कारण बदलती राजकीय समिकरणं आणि राजकीय पक्षांची बदलती भूमिका कारणीभूत आहे. त्यात कुणाची सरशी तर कुणाची पिछेहाट होते हे निकालाचा दिवस म्हणजेच 16 जानेवारी ठरवेल.

पण राज्याच्या राजकारणातील राणे कुटूंबाच्या स्वाभिमानाचा संघर्ष, हिंदूत्वाचा आग्रह धरत राज्यभार हिंदू जनआक्रोश मोर्चा काढणारे भाजपचा हिंदूत्वाचा प्रखर चेहरा आणि आपल्या टिकेच्या बाणांचा गळ टाकत आपल्या गळाला लावणारे आणि विविध मुद्द्यांवर विरोधकांना जाळ्यात पकडणारे नेते आपल्यासोबत आहे. राज्याचे मत्सोद्योग बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या सरकरमध्ये लव्ह जिहादचा कायदा आपण लवकरात लवकर आणतोय. लिव्ह जिहादचा नावावर काही लोकांना हिंदूची संख्या कमी करायची आहे. या देशाला इस्लाम राष्ट्र बनावयाचं आहे. त्यांचं ते थांबावे म्हणून लव्ह जिहादचा कठोर कायदा केला जाईल. पुढे ते म्हणाले पाहूयात या व्हिडिओच्या माध्यामांतून जाणून घेऊया...

थोडक्यात

  1. सध्या राज्याच्या राजकारणात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.

  2. 29 महापालिकांमधील मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील..

  3. विविध आश्वासनांच्या जोरावर मतदानासाठी आकर्षित करण्याचे डावपेच आखले जात आहेत.

  4. वेळोवेळी बदलणाऱ्या राजकीय रणनीतींमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

  5. बदलती राजकीय समीकरणं आणि पक्षांची बदलती भूमिका यामागील प्रमुख कारणे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com