Bhaskar Jadhav : उपमुख्यमंत्री नेमायचे पण विरोधी पक्षनेते नाही ; जाधवांचा सरकारला सवाल...
असंवैधानिक दोन्ही उपमुख्यमंत्रिपद असून घटनेत या पदाची कुठेही तरतूद नाही, सरकारला विरोधी पक्षनेता नियमात असूनही (Winter Session) नेमायचा नसल्याची जहरी टीका सरकारवर चांगलेच ताशेरे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी ओढले आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलायं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, दोन-दोन उपमुख्यमंत्री राज्यात आहेत, कुठेही घटनेत तरतूद नाही. कायद्यात नियमात नाही. कॅबिनेट मंत्र्यांना जो दर्जा असतो, तसा अधिकार उपमुख्यंत्र्याला कोणतेही अधिकार नाहीत. परंतू यांची राजकीय व्यवस्था होण्यासाठी ती पदे नेमली आहेत पण विरोधी पक्षनेते पद नेमायचं नाही, लोकशाही न माननणाऱ्या लोकांसोबत चहापानाला का जावं? असा थेट सवाल भास्कर जाधव यांनी केलायं.
या मुद्द्यावरुन काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर टीका केली. दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. हे संविधानिक पदे आहेत, दोन्ही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानावर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकला, असल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान, यंदा पहिल्यांदाच दोन्ही सभागृहाचं हिवाळी अधिवेशना विरोधी पक्षनेत्याशिवाय पार पाडलं जाणार काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी यासंदर्भात पत्र दिले आहे. मात्र, अद्याप विरोधी पक्षनेत्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
