ताज्या बातम्या
Mumbai Local News : लोकल लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
मुंबई लोकल प्रवाशांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा, 238 नव्या लोकलगाड्यांची खरेदी मंजूर, प्रवास होणार अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर.
लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. गर्दीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने मुंबईसाठी 238 नव्या लोकलगाड्यांच्या खरेदीला मंजुरी दिली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी (ता. 19) लोकसभा अधिवेशनात यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, 'मुंबई लोकलच्या अपग्रेडेशनसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा झाली होती. या नव्या लोकलमुळे गर्दी नियंत्रणात राहील, प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल. जुन्या गाड्यांच्या जागी उच्च-गुणवत्तेच्या आधुनिक लोकल येणार असल्याने मुंबईकरांचा सुरक्षित आणि आरामदायी प्रवास होणार आहे.