RASNA Areez Khambatta
RASNA Areez KhambattaTeam Lokshahi

‘रसना’चे संस्थापक अरिज पिरोजशॉ खंबाटा यांचं निधन

उच्च किंमतीत विकल्या जाणाऱ्या शीतपेयांना पर्याय म्हणून खंबाटा यांनी १९७०च्या दशकात ‘रसना’ या घरगुती शीतपेयाची निर्मिती केली होती.
Published by :
Sagar Pradhan

‘रसना’चे संस्थापक अरिज पिरोजशॉ खंबाटा यांचं शनिवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. रसना ग्रुपच्यावतीने सोमवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. “भारतीय उद्योग, व्यापार आणि सामाजिक विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले,” असेही निवेदनात म्हटले आहे.

उच्च किंमतीत विकल्या जाणाऱ्या शीतपेयांना पर्याय म्हणून खंबाटा यांनी १९७०च्या दशकात ‘रसना’ या घरगुती शीतपेयाची निर्मिती केली होती. अल्पावधीच हे शीतपेय लोकप्रिय झाले होते. आज देशभरातील १८ लाख रिटेल दुकांनांसह जगभरातील ६० देशांमध्येही रसनाची विक्री केली जाते. रसना ही आता जगातील सर्वात मोठ्या शीतपेय उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com