Kolhapur
Kolhapur

Kolhapur : कोल्हापूरमध्ये झेडपी निकालानंतर वाद; घरासमोर गुलाल टाकल्याच्या वादातून मारहाण

कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या निकालानंतर वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Kolhapur) कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या निकालानंतर वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. घरासमोर गुलाल टाकल्याच्या वादातून मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

करवीर तालुक्यातील केर्ली येथे चौगुले गल्लीत चौघांना लोखंडी रॉडने मारहाण झाली. सोमवारी सायंकाळी झालेल्या घटनेनंतर कृष्णात हणमंत चौगुले यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी १६ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला असून मारहाणीत फिर्यादी कृष्णात चौगुले यांच्यासह चौघे जखमी झाले. अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत.

Summary

  • कोल्हापूरमध्ये झेडपी निकालानंतर वाद

  • घरासमोर गुलाल टाकल्याच्या वादातून मारहाण

  • चौघे जखमी, 16 हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com