Sachin Tendulkar son Arjun Tendulkar Marriage : ठरलं तर मग! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी लगीन घाई, 'या' तारखेला होणार लग्नसोहळा

Sachin Tendulkar son Arjun Tendulkar Marriage : ठरलं तर मग! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी लगीन घाई, 'या' तारखेला होणार लग्नसोहळा

क्रिकेट विश्वातील दिग्गज सचिन तेंडुलकर यांच्या घरी लवकरच आनंदाची चाहूल लागणार आहे. त्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात अडकणार असून त्यामुळे सचिन सासऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

क्रिकेट विश्वातील दिग्गज सचिन तेंडुलकर यांच्या घरी लवकरच आनंदाची चाहूल लागणार आहे. त्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात अडकणार असून त्यामुळे सचिन सासऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन आणि सानिया चांडोक यांचा विवाह आयपीएल सुरू होण्यापूर्वी पार पडणार आहे. मार्च 2026 मध्ये हा खासगी लग्नसोहळा होणार असून मुंबईतच हा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. फक्त कुटुंबीय आणि निवडक मित्रमंडळींची उपस्थिती असणार आहे.

काही महिन्यांपूर्वी या दोघांचा साखरपुडा शांतपणे पार पडला होता. नंतर स्वतः सचिन तेंडुलकर यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली होती. सानिया ही यशस्वी उद्योजक असून ती एका प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातून येते.अर्जुन सध्या देशांतर्गत क्रिकेट खेळत असून आयपीएलमध्येही तो नव्या संघाकडून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यातील वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही टप्पे एकाच वेळी महत्त्वाचे ठरणार आहेत. तेंडुलकर कुटुंबात सध्या लग्नाची तयारी सुरू असून चाहत्यांमध्येही या बातमीमुळे उत्सुकता वाढली आहे.

थोडक्यात

  • क्रिकेट विश्वातील दिग्गज सचिन तेंडुलकर यांच्या घरी आनंदाची चाहूल

  • सचिन यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात अडकणार

  • त्यामुळे सचिन तेंडुलकर सासऱ्याच्या भूमिकेत दिसणार

  • अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा विवाह होणार

  • आयपीएल सुरू होण्यापूर्वी लग्नसोहळा पार पडणार

  • मार्च 2026 मध्ये हा खासगी विवाहसोहळा आयोजित

  • लग्न मुंबईतच पार पडणार असल्याची माहिती

  • सोहळ्यासाठी फक्त कुटुंबीय आणि निवडक मित्रमंडळी उपस्थित असणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com