नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य उत्सव; आरोग्य शिबिराचा 2700 नागरिकांनी घेतला लाभ

नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य उत्सव; आरोग्य शिबिराचा 2700 नागरिकांनी घेतला लाभ

गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट, श्रमिक शिक्षण मंडळ आणि एफ. जी. नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचा २७०० नागरिकांनी लाभ घेतला.
Published by :
Siddhi Naringrekar

हर्षल भदाणे पाटील, नवी मुंबई

गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट, श्रमिक शिक्षण मंडळ आणि एफ. जी. नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचा २७०० नागरिकांनी लाभ घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजीचा वाढदिवस आणि आमदार गणेश नाईक यांचा आज 15 सप्टेंबर रोजीचा वाढदिवस या दोन्ही वाढदिवसाच्या निमित्ताने हा समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. तसेच याप्रसंगी विविध योजनांचाही शुभारंभ करण्यात आला. आर्थिक दृष्ट्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन केंद्र, वाचनालय आदी योजनांचा यात समावेश होता.

गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, श्रमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक, सागर नाईक आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचे औचित्य साधून दिघा विभागासाठी रुग्णवाहिका सेवेचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. वाढदिवसाला उत्सवी स्वरूप न देता महाआरोग्य शिबिरा सारखा उपक्रम राबवत कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार गणेश नाईक यांना वाढदिवसाच्या विधायक शुभेच्छा दिल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com