Jammu-Kashmir
Jammu-Kashmir

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई; मुफ्ती इरफानला शोपियानमधून केली अटक

फरिदाबाद येथील एका डॉक्टरच्या घरातून ३६० किलो स्फोटके जप्त करण्यात आले
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • फरिदाबाद येथील एका डॉक्टरच्या घरातून ३६० किलो स्फोटके जप्त

  • जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई

  • मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक

(Jammu-Kashmir) फरिदाबाद येथील एका डॉक्टरच्या घरातून ३६० किलो स्फोटके जप्त केली आहेत, ज्यात असॉल्ट रायफल आणि दारूगोळा समाविष्ट होता. या प्रकरणात अटक केलेल्या डॉक्टरचे नाव मुझम्मिल शकील आहे.

यातच आता फरीदाबादमध्ये जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आता शोपियानमधून मुफ्ती इरफान अहमद याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अशा अनेक राज्यांमध्ये एकत्रित शोधमोहीम राबवून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांचा साठा जप्त केल्याची माहिती मिळत आहे.

डॉ. मुजम्मिलसह ज्या 7 प्रमुख आरोपींची नावे पोलिसांनी जाहीर केली होती, त्या यादीमध्ये मुफ्ती इरफानचाही समावेश आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवादविरोधी कारवाईत मोठे यश मिळवल्याचे पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com