बाळासाहेबांच्या तैलचित्रावरुन नवा वाद; तैलचित्र ऐनवेळी बदलल्याने चित्रकार चंद्रकला कदम यांची नाराजी
Admin

बाळासाहेबांच्या तैलचित्रावरुन नवा वाद; तैलचित्र ऐनवेळी बदलल्याने चित्रकार चंद्रकला कदम यांची नाराजी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.
Published by :
Siddhi Naringrekar

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. विधानभवनातील सेंट्रल हॉलमधील लागणारे बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र ऐनवेळी बदलल्याने चित्रकार चंद्रकला कदम नाराज झाल्या आहेत. बाळासाहेबांचे हे तैलचित्र चित्रकार किशोर नादावडेकर यांनी साकारले आहे. चंद्रकला कदम यांनी साकारलेले तैलचित्र विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये न लावल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

विधानभवनातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा काल 23 जानेवारी पार पडला. बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त हे तैलचित्र लावण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते अजित पवार, अंबादास दानवे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे प्रमुख राज ठाकरे, अॅड. निहार ठाकरे, स्मिता ठाकरे, चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर, बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आदी उपस्थित होते.

यावर एका माध्यमाशी प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, "बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या चित्रकारितेच्या कौशल्यावर विश्वास ठेवून मला देशाच्या संसदेत त्यासोबत गुजरात विधानभवनमध्ये तैलचित्र काढण्याची संधी दिली होती. त्यानंतर मी महाराष्ट्राच्या विधानभवनातील सहा तैलचित्र साकारले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र साकारण्याची सरकारी ऑर्डर मला देण्यात आली. असे असताना ऐनवेळी हे चित्र बदलणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी एका चित्रकाराच्या दृष्टिकोनातून जो विश्वास माझ्यावर टाकला, त्या विश्वासाचा तुम्ही अपमान करु नये."असे त्या म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com